सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता.कागल येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी एनसीसी प्रथम वर्ष कॅडेट आदित्य ताशीलदार याने ३ ×३ फूट आकाराची आकर्षक देशभक्तीपर रांगोळी काढली. व एनसीसी विद्यार्थिनी प्रतीक्षा परीट हिने आकर्षक फलक लेखन केले.
महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर एनसीसी कॅडेट्सनी नेत्रदीपक सायलेंट ड्रिल करून उपस्थितांची मने जिंकली.शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ. एस. बी. पोवार, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. के एस पवार व उपप्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनानिमित्त मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. ए. डी. कुंभार यांनी सुंदर फलक लेखन, आकर्षक रांगोळी व नेत्र दीपक ड्रिल अशा विविध पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केल्याबद्दल एनसीसी प्रमुख लेफ्टनंट प्रा. व्ही. ए. प्रधान आणि सर्व कॅडेट्सचे भरभरून कौतुक केले. त्यांना त्यांच्या भवितव्यासाठी अनेक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व विभागाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रशासकीय वर्ग, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्व एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.