नोकर भरती लागती ती आताच का केली, नोकर भरती चा १५ लाख रुपये घेवून नेत्यांनी बाजार मांडला : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुदाळतिट्टटा प्रतिनिधीः
कूर ( भुदरगड ) येथे राजश्री शाहू आघाडीचा ठराव धारकांचा मेळावा संपन्न झाला.
राजश्री शाहू विरोधी आघाडी मेळाव्यात बोलताना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसनसो मुश्रीफ म्हणाले, वीस लाख दूध संकलन करण्यासाठी जेवढी नोकर भरती लागती ती आताच का केली ? असा प्रश्न उपस्थित केला. नोकर भरतीत १५ लाख रुपये घेवून नेत्यांनी गोकुळ संघाचा बाजार माडला आहे.ते कूर ( भुदरगड ) येथे राजश्री शाहू आघाडीचा ठराव धारकांचा मेळावा संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी आम.के.पी.पाटील होते.
स्वागत-प्रास्ताविक दत्ताजीराव उगले यांनी केले. वासाच्या दूधाला योग्य किंमत देवून ,सत्ता दीली तर दिवाळीला महिला सभासदांना सोण्यांन मडवू या पॅनल मते द्या गोकुळ राज्यात एक नंबर वर आणू.असे आश्वासन दिले.
उमेदवारांची ओळख केडीसीसीचे संचालक रणजितसिंह पाटील यांनी करुन दिली.
जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील या मेळाव्यात बोलताना म्हणाले , खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिक यांची प्रवृत्ती आहे. मुन्ना महाडिक व महादेवराव यांचे ४० टँकर आहेत . जिल्ह्यातील दूध उत्पादकाला कळले पाहिजे तुम्ही फक्त ४० टँकर चे बिल मिळवण्यासाठी फिरत आहात. ही महाडिक प्रवृत्ती जिल्ह्यातून हद्दपार करून गोकुळवर झेंडा फडकवू असा विश्वास व्यक्त केला.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले,हे पॅनल सर्वसामान्य नागरिकांना घेवून जाणारे आहे.या जिल्ह्यात कधीचे इतकी गोकुळ विरोधात लाट पसरली आहे. कोल्हापूर जिल्हा गोकुळ राजकारणात भुदरगड क्रांती करणार हे निश्चित आहे.२१ मते पॅनल टू पॅनल मते मारू व गोकुळ निवडणुकीत जी मोट बांधली आहे ती विजयी पताका गोकुळ वर फडकवू असे आवाहन त्यांनी दूध उत्पादक सभासदांना केले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील,गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील,अरुण डोंगळे , माजी जि. प.सदस्य प्रा .अर्जुन आबिटकर ,जि. प. सदस्य जीवन पाटील,नंदुकुमार ढेंगे,तालुका अध्यक्ष शामराव देसाई,सचिन घोरपडे,उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सुत्रसंचलन पी.जी.पाटील यांनी केले. तर भुदरगड तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष विश्वनाथ कुंभार यांनी मानले.
गोकुळमधील महाडीक टँकरसाठी मतदाराच्या दाराला.
गोकुळ मध्ये महाडीकांचे ४० टॅकर आहेत यातून होणारं उत्पन्नाचे कोटयावधीचे स्त्रोत बुडेल म्हणून उत्पादकाचे हितासाठी नव्हे तर स्वतःचे स्वार्थासाठी ठरावधारकांच्या दारात पोहचत आहेत. सावध राहा. असा सुचक इशारा देताच टाळ्याचा कडकड़ाट झाला.