ताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाझे सरकार अडचणीत आणेल हे आधीच सांगितले होते ; राऊत यांच्या वक्तव्याने चर्चेला ऊत

मुंबई ऑनलाईन :

सचिन वाझे याला पोलिस दलात परत घेऊ नये, त्याची एकूण काम करण्याची पद्धत माहीत असल्याने तो कधी ना कधी सरकारला अडचणीत आणेल असे मी सांगितले होते, असे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. सचिन वाझे याला पोलिस दलात सामावून घेण्यास आपला विरोध होता असेही ते म्हणाले. मात्र, हे कोणत्या नेत्याला बोलले होते हे मात्र त्यांनी सांगितले नाही.

राऊत म्हणाले, ज्या शिवसेना नेत्यांशी मी वाझेंबाबत बोललो होतो त्यांना त्याची जाणीव होती. वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारला धडा मिळाला आहे. एका अर्थाने अशा प्रकारची घटना घडली ते चांगलेच झाले. कोणतीही व्यक्ती वाईट नसते. पण कधीकधी परिस्थिती तिला तसे बनवते. वाझे हे सरकारसाठी मोठी अडचण ठरू शकते, हे मी तेव्हाच सांगितले होते. त्यांची कार्यपद्धती आणि व्यवहार पद्धतच वादग्रस्त आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांना त्याची पूर्ण माहिती नसल्याने त्यांनी विधानसभेत त्याचे समर्थन केल्याचेही ते म्हणाले.

सचिन वाझे हा मनसुख हिरेन या व्यापाऱ्याच्या हत्येच्या प्रकरणातील प्रमुख संशयित आहे. तसेच उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवलेली कार सापडली होती त्यातही संशयित आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयए करत आहे. एनआयएच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. तर विरोधी भाजप सरकार महाविकास आघाडीवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाही. वाझे प्रकरणावरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची तोंडे तीन बाजुला असल्याचे पहायला मिळत आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks