महाराष्ट्रराजकीय
‘गोकुळ’चा कारभार ‘आबाजीं’कडेच; विश्वास पाटील यांची गोकुळच्या चेअरमन पदी निवड

कोल्हापूर प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या चेअरमन पदी विश्वास नारायण पाटील ऊर्फ आबाजी यांची निवड ताराबाई पार्क येथील कार्यालयात सर्व संचालकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आली.
या बैठकीमध्ये पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा निरोप सर्व संचालकांना देण्यात आला. त्यानंतर सर्व संचालक गोकुळ शिरगाव येथील बैठकीकडे रवाना झाले. दुपारी एक वाजता निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
