ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : सेंद्रिय गटांना वाहन वाटपाचा कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे

परंपरागत कृषि विकास योजने अंतर्गत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते सेंद्रिय गटांना वाहन वाटपाचा कार्यक्रम काल जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला.
कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कृषि सहसंचालक दशरथ तांभाळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, आत्माच्या प्रकल्प संचालक सुनंदा कुऱ्हाडे, आत्माचे प्रकल्प उपसंचालकजालिंदर पांगरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक तसेच सेंद्रिय गटांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पीजीएस ऑरगॅनिक प्रमाणपत्राचे प्राथमिक स्वरुपात वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी गटांना वाहनाचा वापर आपला शेतमाल विक्रीसाठी संत सावता माळी रयत बाजार अभियानअंतर्गत स्थापित झालेल्या शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्रावर आणण्याबाबत तसेच इतर वाहतुकीसाठी वापर न करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महालक्ष्मी सेंद्रिय गटामार्फत सेंद्रिय भाजीपाला बास्केट भेट म्हणून देण्यात आले.
जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेती योजनेअंतर्गत एकूण 37 गट स्थापन झाले आहेत. या गटांना वाहन खरेदीसाठी 1.20 लाख रूपयांची तरतूद असून श्री. महालक्ष्मी सेंद्रिय शेती उत्पादक गट, धरणगुत्ती ता. शिरोळ, ब्रम्हदेव सेंद्रिय शेतकरी गट, सरंबळवाडी ता.आजरा, शंभू महादेव सेंद्रिय शेती गट, खुटाळवाडी ता.शाहूवाडी या गटांनी वाहन खरेदी केलेले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks