गडहिंग्लज शहरात येणाऱ्या भाजी विक्रेत्यांना शालेय क्रीडांगणाच्या परिसरामध्ये बसवावे-माजी सैनिक कुमार पाटील

गडहिंग्लज प्रतिनिधी : सोहेल मकानदार
गडहिंग्लज शहरात येणाऱ्या भाजी विक्रेत्यांना शालेय क्रिडांगणाच्या परिसरामध्ये बसवावे या मागणी साठी पश्चिम महाराष्ट्र सैनिक फेडरेशन कोर समितीचे सदस्य कुमार पाटील (माझी सैनिक) यांनी या बाबतचे निवेदन गडहिंग्लजचे मुख्याधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्रामध्ये कोरोना महामारीची दुसरी लाट मार्च महिन्यापासून आल्याने राज्य शासनाने कोरोना वर नियंत्रण मिळवण्यासाठी शनिवार व रविवार दिवशी मिनी लॉकडाऊन केले होते . असे करुनही कोरोना परिस्तिथी नियंत्रणाखाली येत नसल्याने जीवनावश्यक वस्तू , भाजीपाला , दुध , किराणा साहित्य इत्यादी ची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवत बाकी सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला होता . कोरोना रुग्ण वाढीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह गडहिंग्लज शहर व तालुका हेहि अपवाद राहिले नाहीत . गडहिंग्लज शहरात रुग्ण संख्या वाढत असल्याने जनता कप y चा निर्णय घेण्यात आला . मेडिकल व हॉस्पिटल सेवा सोडून सर्व १० दिवस बंद ठेवण्यात आले यामुळे शहरात गर्दी झाली होती . आता जनता कयूं संपल्यावर परत तीच परिस्थिती उदभवणार . गडहिंग्लज आणि परिसरातील बऱ्याच लोकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे . शेतकऱ्यांचे व भाजी विक्रेत्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शहरातील मधुश्रेष्टी विद्यालय , काळू मास्तर विद्यालय , गडहिंग्लज हायस्कूल , साधना हायस्कूल , जागृती हायस्कूल , या शाळेच्या क्रीडांगण परिसरात भाजी विक्रेत्यांना भाजी विकण्यास सोय करावी यामुळे शहरात एकाच ठिकाणी होणारी गर्दी कमी होईल आणि कोरोना रुग्ण संख्या वाढीवर नियंत्रण मिळवता येईल , जनसामान्यांच्या हितासाठी पालिकेकडून योग्य व सकारात्मक कारवाई करण्यात यावी ही विनंती निवेदनाद्वारे केली आहे.