ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शाहू नाका येथील वैभव हौसिंग सोसायटी यांचेकडून महापालिकेच्या कोवीड सेंटरसाठी 3 दूरध्वनी संच व स्मशानभूमीसाठी 1 लाख 25 हजार शेणी दान

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे
महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरसाठी शाहू नाका येथील वैभव हौसिंग सोसायटी यांचेकडून महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरसाठी 3 दूरध्वनी संच व स्मशानभूमीसाठी 1 लाख 25 हजार शेणी देण्यात आल्या.
सदरचे साहित्य संस्थेचे अध्यक्ष युवराज माळी यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे दिले. महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी महापालिकेस वस्तू स्वरुपात मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन शाहू नाका येथील वैभव हौसिंग सोसायटी यांचेकडून महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरसाठी 3 दूरध्वनी संच व स्मशानभूमीसाठी 1 लाख 25 हजार शेणी देण्यात आल्या. माजी नगरसेवक प्रा.जयंत पाटील यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. यावेळी महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील व विपुल वणकुंद्रे उपस्थित होते.