मुरगूडात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंती निमित्त धनगर समाज व मुरगूड ग्रामस्थ यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .यानिमित्त बिरदेव ओवीकार मंडळ मुरगूड, व मराठा संघ वाशी यांचा भव्य धनगरी ओवीचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष मुरगूडचे पोलिस निरीक्षक विकास बडवे ,तर प्रमुख उपस्थितीत युवा नेते दिग्विजय भैय्या पाटील होते तर कार्यक्रमाचे आयोजन , यशवंत क्रांती संघटना कागल तालुका उपाध्यक्ष सिध्दू दिवटे यांनी केले
मुरगुड मधील तुकाराम चौक येथे भव्य असा ढोल वादन व धनगर ओवी गाण्यांचा कार्यक्रम आयोजन केला तर आला होता यावेळी कार्यक्रमाचे स्वागत मुरगूड धनगर समाजाचे अध्यक्ष आप्पा मेटकर यांनी केले तर प्रास्ताविक सिद्धु दिवटे यांनी केले.
यावेळी कागल तालुका अध्यक्ष संदिप हजारे, विजय गोधडे,कोल्हापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आप्पासो मेटकर सुरेश दिवटे, रणजित मेटकर, साताप्पा मेटकर महादेव पाटील सिध्दापा मेटकर प्रसिल मेटकर सिद्धाप्पा मिटकर यांच्यासह ग्रामस्थ व धनगर समाज उपस्थित होते आभार राजू मेटकर यांनी मानले.