ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
वेतवडे उपसरपंच पदी महादेव वीर यांची बिनविरोध निवड

कळे प्रतिनिधी : अनिल सुतार
पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी महादेव मारुती वीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्य शिवाजी पाटील यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. उपसरपंच निवडी वेळी अध्यासी अधिकारी म्हणून लोकनियुक्त सरपंच रेखा अनिल पोवार या होत्या. त्यांच्या हस्ते उपसरपंच महादेव वीर यांचा सत्कार करण्यात आला.
सदर निवडीवेळी सर्कल अधिकारी सुरेश ठाकरे ,ग्रामसेवक युवराज पाटील, सदस्य नंदा दळवी, शिवाजी पाटील,संभाजी गुरव यासह सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी,गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.