ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापालिकेतील एकाला 1 लाखाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक ; मनपा वर्तुळात प्रचंड खळबळ

पुणे महानगरपालिकेतील एकाला 1 लाख रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे त्यामुळे पुणे मनपा वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. संबंधिताविरूध्द शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविण दत्तात्रय पासलकर (50, बिगारी, पुणे मनपा, पुणे) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे आरोग्य विभागातून मुकादम म्हणून सन 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांच्या शिल्लक अर्जित रजेच्या रोखीकरणाचा बिलाचा चेक देण्यासाठी पुणे मनपातील प्रविण पासलकर यांनी 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.

पडताळणीमध्ये प्रविण पासलकर यांनी 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून लाच पुणे मनपाच्या आवारात सरकारी पंचासमक्ष घेतली. त्यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे , अप्पर अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली असल्याचे पोलीस उप अधीक्षक नितीन जाधव यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks