ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी आणखी दोन याचिका

मुंबई :

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या आणि एकूणच संपूर्ण घटनाक्र माच्या चौकशीच्या मागणीसाठी आणखी दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत.

परमबीर यांनीही देशमुख यांच्यावरील आरोपांच्या आणि त्यांच्या कारभाराच्या सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी गुरुवारी फौजदारी जनहित याचिका केली होती. वकील घन:श्याम उपाध्याय आणि पुणेस्थित सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी या याचिका केल्या आहेत. देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला या दोघांनी आपल्या याचिकेत दिला आहे.

उपाध्याय यांनी आपल्या याचिकेत परमबीर यांनी देशमुख यांच्यावर के लेल्या आरोपांची सखोल चौकशीचे आदेश देण्याची मागणी के ली आहे. पोलीस आणि राजकीय नेत्यांंकडून खंडणी मागितली जात असल्याच्या आरोपांची, उद्योगपती मुके श अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवण्यापासून ते परमबीर यांनी देशमुख यांच्यावर आरोप करण्यापर्यंतच्या सगळ्या घटनाक्र माची सीबीआय वा स्वतंत्र तपास यंत्रणेतर्फे चौकशी करावी, अशीही मागणी के ली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks