बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९९.५३ टक्के

NIKAL WEB TEAM :
आज महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा बारावीचा निकाल 99.53 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 99.45 टक्के, कला शाखेचा निकाल 99.83 टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल 99.91 टक्के लागला आहे. राज्यातील 46 विद्यार्थ्यांना 100 पैकी शंभर टक्के गुण मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षांचा निकाल मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी जाहीर केला.आज दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट आउटही काढता येणार आहे.
विभागनिहाय टक्केवारी :
राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा : 99.81 टक्के
दुसऱ्या क्रमांकावर मुंबई विभाग : 99.79 टक्के
पुणे : 99.75 टक्के
कोल्हापूर : 99.67 टक्के
लातूर : 99.65 टक्के
नागपूर : 99.62 टक्के
नाशिक : 99.61 टक्के
अमरावती : 99.37 टक्के
औरंगाबाद : 99.34 टक्के
बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, दुपारी 4 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल