एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी, तिघांवर गुन्हा दाखल.

कळे-वार्ताहर अनिल सुतार
पन्हाळा तालुक्यातील कळे येथे एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत राजेंद्र रघुनाथ देसाई वय ४६ हे गंभीर जखमी झाले असून संशयित आरोपी संजय नामदेव कुदळे वय ४२ रा.पणुत्रे ता . पन्हाळा व त्याचे इतर दोन अनोळखी साथीदार वय ३५ ते ४० अंदाजे या तिघांविरुद्ध कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र देसाई व संजय कुदळे एकमेकांच्या ओळखीचे असून गेल्या १५ दिवसांपूर्वी एकमेकांच्या पाहण्याच्या कारणावरुन वाद झाला होता. सोनदेव बेलेकर व प्रसाद डकरे यांनी तो वाद मिटविला होता. बुधवार दि.६ रोजी. सायंकाळी ८वा. सुमारास हॉटेल रंजनराज जवळ राजेंद्र देसाई हे आपले श्रीराम ॲटोमोबाईल स्पेअर पार्टचे दुकान बंद करत असताना आरोपी संजय कुदळे हा त्याच्या दोन अनोळखी साथीदारासह देसाई यांच्या दुकानासमोर येऊन मागील झालेल्या भांडणाचा राग मनात धरून राजेंद्र देसाई यास आपल्या इतर दोन अनोळखी साथीदारांना हात धरायला लावून शिविगाळ व मारहाण करु लागला तसेच देसाई यास जीवे मारण्याच्या हेतूने आरोपी संजय कुदळे याने हातातील चाकूने देसाई यांच्या डोक्यात पुढील व मागील बाजूस, नाकावर वार करून गंभीर जखमी केले.जखमी देसाई यांना कळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात येऊन पुढील उपचाराकरिता सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले. अधिक तपास सपोनि रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरिक्षक सतीश मयेकर करत आहेत.