ताज्या बातम्या
यशस्वी ग्रामीण महिला संघ करवीर यांचे वतीने परिते येथे वृक्षारोपन

कौलव प्रतिनिधी :
जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधुन चैतन्य संस्था प्रेरीत यशस्वी ग्रामीण महिला संघ करवीर यांचे वतीने परिते ता करवीर येथे वृक्षारोपन करणेत आले.
यावेळी संघाच्या व्यवस्थापीका सुजाता कलिकते यांनी आज जागतिक पर्यावरण निमित्त संपूर्ण नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे झाडे लावुन व पाणी वाचवुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येवुन प्रयत्न केला पाहीजे आपल्याला श्वसनासाठी झाडे आॕक्सिजन पुरवतात त्यासाठी वृक्षतोड न करता झाडे लावा झाडे जगवा असे आवाहन केले.
यावेळी संघ व्यवस्थापीका सुजाता कलिकते कार्यकर्त्यां शितल कुसाळे,सुमन पोकर्णेकर,वंदना कांबळे,दर्शना कांबळे,शिला डोंगळे,कमल पोकर्णेकर आदि सह बचत गटातील महिला उपस्थित होत्या.