ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरी व भडगाव येथे महिलांना जिल्हा परिषद मार्फत प्रशिक्षण

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
कोल्हापूर जिल्हा परिषद मार्फत महिला व बालकल्याण विभागाकडून महिलांसाठी कुकिंग व केटरिंग दहा दिवसाचे प्रशिक्षण नेसरी व भडगाव येथे दिनांक 11-2-2022 ते 21-2-2022 पर्यंत प्रशिक्षण चालू झाले असून सदर कुकिंग प्रशिक्षण उद्घाटनाच्या वेळी महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळाच्या संचालिका कल्याणी जाधव व प्रियांका जामसंडेकर तसेच सौ अर्चना ताई हेमंत कोलेकर मॅडम, नेसरी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक सदस्य उपस्थित होते प्रशिक्षणाच्या ट्रेनर गडहिंग्लज येथील सौ वंदना महादेव कातकर यांनी प्रशिक्षणामध्ये भेल, पाणीपुरी, बिस्किट , बॉम्बे शेव पुरी, केक, पंजाबी डिश , व्हेज व नॉनव्हेज यासह इतर डिशेस शिकवित्त आहेत. यामुळे महिलां आपल्या पायावर स्वयं रोजगारासाठी उभ्या राहतील असे सौ वंदना कातकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.