ताज्या बातम्या

उद्या रात्री ८ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू, पाहा काय सुरू काय बंद राहणार…!!

मुंबई, १३ एप्रिल: 

कडक निर्बंध लागू करण्यात आल्यानंतरही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होतच आहे. यामुळेच आता कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यात कठोर निर्बंध लावण्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधून लॉकडाऊन संदर्भातील माहिती दिली आहे. या कठोर निर्बंधांमध्ये काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची सविस्तर माहिती राज्य सरकार कडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

▪️गरजूंना शिवभोजन थाळी पुढील एक महिना मोफत देणार

▪️पेट्रोल पंप सुरू राहणार

▪️हवाई वाहतूक, रेल्वे सेवा सुरू राहणार

• सेबी, पेट्रोलियन, आयटी कार्गो सेवा सुरू राहणार

  1. कंपन्यांनी त्यांच्या कॅम्पसमध्येच कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्था करावी

▪️हॉटेल्स बंद राहणार, होम डिलिव्हरी सुरू

▪️पार्सल सेवा सुरू राहणार

▪️अति आवश्यक सुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा सुरू राहणार

▪️अत्यावश्यक आणि योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही

▪️अनावश्यक ये-जा बंद

▪️१५ दिवस संचारबंदी लागू राहणार

▪️उद्या संध्याकाळपासून राज्यात संचारबंदी लागू

▪️उद्या रात्री ८ वाजल्यापासून कठोर निर्बंध

येत्या दिवसांत पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे, हे मतदान झाल्यावर तेथेही कठोर निर्बंध लागू होणार

कडक पावलं उचलण्याची वेळ आली आहे

नाईलाजाने काही बंधनं घालावी लागणार

🔸निवृत्त डॉक्टर आणि नर्सेसला मदतीचं आवाहन

🔸राजकीय पक्षांना पुन्हा एकदा आवाहन, राजकारण करू नका

🔸राज्यात लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे

🔸लस दिल्यानंतर प्रतिकारकशक्ती येण्यासाठी काही दिवस जावे लागतात

🔸जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे

🔸हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे

🔸राज्यात ऑक्सिजनची आणखी गरज लागणार

🔸इतर राज्यांतून ऑक्सिजन मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे

राज्यातील एकही रुग्ण आणि मृत्यू लपवलेला नाहीये

सध्याची वेळ निघून गेली तर परिस्थिती आणखी बिकट होईल

राज्यात सध्या १२०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा रुग्णांसाठी वापर

राज्यात बेड्स मिळत नाहीयेत, ऑक्सिजनचा आता तुटवडा निर्माण होऊ लागला आहे, रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा निर्माण होत आहे

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वैद्यकीय सुविधांवर भर पडला आहे

राज्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे

कोरोनामुळे परिस्थिती भयंकर झाली आहे

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

क्षमतेपेक्षा अधिक भार पडल्याने चाचण्यांचे अहवाल येण्यास उशीर होतोय

कोरोना विरुद्धच्या लढाईला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे

राज्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केवळ रुग्णांची संख्या वाढत नाहीये तर यावेळी कोरोना बाधित मृतकांच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. एकूणच राज्यातील परिस्थिती पाहता आणि कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारला लॉकडाऊनचं पाऊल उचलावं लागलं आहे.

राज्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्याच्या संदर्भात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्ससोबतही बैठक घेतली. कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असल्यास काही काळासाठी राज्यात कडक निर्बंध लावावेच लागतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की, लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही व्यक्तींमध्ये कोविडची लक्षण दिसत आहेत. या संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोललो आहे. कोरोनाची साखळी आपल्याला तोडायची आहे. आरोग्य सुविधा वाढवणं गरजेचं आहे. पण आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. मध्यंतरीचा काळ बरा होता. सर्व व्यवहार सुरू झाले होते. पण पुन्हा एकदा संसर्ग सुरू झाला आहे. आता तर तरुण वर्ग बाधित आढळतोय. आपण सर्वांना लस देण्याची मागणी करत आहोत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks