आजचा प्रकार एवढ्यावरच थांबला नसून कोल्हापूर जिल्ह्यात जेव्हा केव्हा नालायक नारायण राणे पाय ठेवेल, तेव्हा बांगड्यांचा आहेर व कोल्हापुरी पायतानचा प्रसाद ठरलेला : शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव

शिरोळ प्रतिनिधी : विनायक कदम
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह आणि बेताल वक्तव्य केले. या बेताल आणि बेबंद कोंबडीचोराच्या निषेधार्थ शिवसेना कोल्हापूर जिल्हा यांच्यावतीने जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली पुणे-बेंगलोर महामार्गावरील किणी टोल नाका येथे चक्काजाम करण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे हे तमाम शिवसैनिकांचे प्रेरणास्थान व ठाकरे कुटुंब आमचे श्रद्धास्थान आहे. गेल्या २ वर्षात मा.उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या नव्या उंचीवर कूच करत आहेत व राज्याचे प्रथम नागरिक म्हणून मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे हे नागरिकांची तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत आहेत. याचेच फलित म्हणून मा.उद्धवजी ठाकरे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून जनमानसांत प्रभावी ठरले आहेत.
या सर्व गोष्टींचा पोटशूळ उठलेल्या भाजपा व नारायण राणे यांनी त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्यावर बेताल वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे. परंतु इथून पुढे आपली जीभ सांभाळली तर ठीक अन्यथा तमाम शिवसैनिक कोल्हापुरी पायतानचा प्रसाद कोंबडीचोर नारायण राणेला दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.
आजचा प्रकार एवढ्यावरच थांबणार नसून हा कोंबडीचोर जेव्हा केव्हा कोल्हापूर जिल्ह्यात पाय ठेवेल, तेव्हा या नालायक नारायण राणेला बांगड्यांचा आहेर व कोल्हापुरी पायतानचा प्रसाद ठरलेला आहे, ही पूर्वकल्पना व सूचनावजा इशारा शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मा.मुरलीधर जाधव यांनी शिवसैनिकांनी केलेल्या महामार्ग रोकोवेळी दिला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान,मधुकर पाटील,महादेव गौड,नामदेव गिरी,तालुकाप्रमुख बाजीराव पाटील,दत्ता पोवार,वैभव उगळे,आनंद शेट्टी,महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ.मंगल चव्हाण,सौ.दीप्ती कोळेकर,सौ. माधुरी टाकारे,सौ.सुवर्णा धनवडे,सौ.रेखा जाधव,सौ.उषा चौगुले,तेजश्री पाटील,सौ.मनीषा पवार,नगरसेवक पराग पाटील,बाळासाहेब मुधाळे,वडगाव शहरप्रमुख संदीप पाटील,युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवाजी पाटील,संदीप दबडे,दिपक यादव यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.