ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर : वारणा नदीत महापुरात युवक वाहून गेला , रात्र झाडावर बसून काढली, तेरा तासानंतर सुखरुप सुटका

मांगले- काखे पुलाजवळ वारणा नदीला आलेल्या महापुरात गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास बजरंग पांडुरंग खामकर (वय-५८, रा. लादेवाडी) हा नदीच्या पाण्यात पडला.
रात्रीच्या अंधारात नदीच्या पात्रात मध्यभागी एका झाडाचा आधार घेवून रात्र झाडावरच बसुन काढली. सकाळी सात वाजता शेतातील माणसे दिसल्यावर तो आरडा -ओरडा करु लागल्यानंतर हा प्रकार समजला.
सकाळी मांगले व देववाडी नदीकाठावरील शेतकरी शेतात गेल्यानंतर…वाचवा…वाचवा…अशा आरोळ्या ऐकु आल्या. त्यावेळी नदीच्या मध्यभागी पुरात एक इसम अडक़ल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलीस पाटील यांनी शिराळा तहसिलदार यांना कळविले.
त्यानंतर तातडीच्या हालचाली सुरु झाल्या. कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनची एन.डी.आर.एफ ची टीम सकाळी सव्वा दहा वाजत दाखल झाली. तब्बल तेरा तास पुरात अडकलेल्या या युवकांला पथकाने बोटीद्वारे सुखरुप बाहेर काढले.