ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगुड ग्रामीण रुग्णालयाला नगरसेवक सुनील रणवरे यांचेकडून वैद्यकीय साहित्याची मदत

मुरगूड प्रतिनिधी :

स्व.माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रेरणेने ग्रामीण रुग्णालयाला दैनंदिन गरजेच्या वैद्यकीय साहित्याची मदत माजी नगरसेवक सुनील रणवरे यांच्यामार्फत प्रदान करण्यात आली. तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या हस्ते खुर्च्या, गॅस, शेगडी, औषधे, सॅनिटायझर, मास्क इत्यादी वस्तू अधीक्षक डॉ. भगवान डवरी यांनी स्वीकारल्या.
लोकनियुक्त नगराध्यक्ष जमादार यांनी रणवरे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय क्षेत्राची कसोटी पणाला लागली आहे. महामारीच्या तिसऱ्या टप्प्याचे फार मोठे भय पसरले आहे. यासाठी नागरिकांनी वैद्यकीय सेवेला सर्वतोपरी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. डॉ. डवरी यांनी या उपक्रमाचे कौतुक करून कोरोना काळातील ग्रामीण रुग्णालयाचे योगदान स्पष्ट केले आणि रणवरे यांना धन्यवाद दिले.
याप्रसंगी नगरसेवक संदीप कलकुटकी, मारुती कांबळे, विकी साळोखे, आकाश दरेकर, संजय भारमल, धोंडीराम परीट , विराज रणवरे, मोहन रणवरे, विनायक रणवरे, सौ. मनीषा रणवरे, बी. एस. खामकर, विनायक भोई, अर्जुन रानमाळे, सोहेल नदाफ, संग्राम डवरी, मयूर आंगज, ओमकार खराडे, सर्जेराव कदम, रुग्णालयाचे सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते. स्वागत विराज रणवरे व प्रास्ताविक विकी साळोखे यांनी केले तर आभार धोंडीराम परीट यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks