दुर्गम शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देणार : समरजितसिंह घाटगे; राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
राजे फाउंडेशनच्या माध्यमातून गट -तट, मतदारसंघ न बघता कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्याची सुरुवात आजरा तालुक्यातील सोहाळे या शाळेतून करणार आहे.अशी घोषणा शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथे झालेल्या राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्यावतीने सन २०२० व २०२१ या दोन वर्षातील स्व. राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते.१११ शिक्षकांना या पुरस्काराने गौरविले.
यावेळी कोरोना काळात सेवा बजावताना मयत पावलेल्या कोरोना योद्धे शिक्षकांना राज्य शासनाने जाहीर केलेली 50 लाख रुपयांची मदत तात्काळ द्यावी. अशी आग्रही मागणी केली. तसेच राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या माध्यमातून शिक्षकांसाठी विशेष कर्ज योजना सुरू करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
अध्यक्षस्थानी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा व शाहू साखर कारखान्याच्या संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे होत्या.
ते पुढे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पाया घातला. स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनीही तो पुढे चालविला. गुणवंत शिक्षकांच्या पाठीवर या पुरस्काराच्या माध्यमातून थाप मारून त्यांचाच वारसा मी पुढे चालवीत आहे. हा पुरस्कार देत असतांना गट-तट न बघता गुणवत्ता हाच निकष ठेवला आहे . शिक्षक समाज घडवण्याचे काम करतात. कोरोना काळात त्यांनी स्वतःच्या जीवाची, कुटुंबीयांची काळजी न करता सेवा बजावली आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचे कार्यही केले आहे. त्यांनी खर्या अर्थाने राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा चालवला आहे.एकमेकांच्या सहकार्याने शाहूंची जन्मभूमी ही कर्मभूमी करण्यासाठी प्रयत्न करूया.तसेच स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या स्वप्नातील आदर्श कागल घडवूया. असेही ते म्हणाले .
यावेळी गोकुळचे माजी चेअरमन रणजीतसिंह पाटील,’बिद्री’चे संचालक बाबासाहेब पाटील, ,अनुराधा क्षीरसागर,अविनाश चौगुले,श्रद्धा खोत यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,
राजे बँकेचे चेअरमन एम.पी.पाटील,शाहू कृषीचे चेअरमन अनंत फर्नांडीस,दत्तामामा खराडे,राजेंद्र तारळे,शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार ,गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
स्वागत रमेश कांबळे यांनी केले.आभार यांनी मानले.आभार संदीप मगदूम यांनी मानले.
महिला शिक्षकांवर विशेष जबाबदारी
यावेळी श्री.घाटगे यांनी कॅन्सरमुक्त कागल अभियानाअंतर्गत महिलांसाठी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून सुहासिनीदेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली व नवोदिता घाटगे यांच्या नेतृत्वाखाली कॅन्सर बाबत जनजागृतीपर अभियान राबविण्यात येणार आहे.त्यावेळी महिला शिक्षिकांनी यासाठी विशेष योगदान द्यावे. असे आवाहन त्यांनी महिला शिक्षिकांना केले.
स्टॅन्ड अप कागल
पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी स्टॅन्ड अप इंडिया नावाची संकल्पना राबवली. त्याचप्रमाणे राजे बॅंकेच्या माध्यमातून बहुजन समाजातील तरुणांनी स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी गट-तट न बघता प्रयत्न सुरू आहेत.राजे बँकेच्या माध्यमातून बहुजन समाजातील तरुणांना पायावर उभे करण्यासाठी वेगवेगळ्या कर्ज योजना आणल्या आहेत. त्यासाठी शिक्षकांनी सहकार्य व सूचना कराव्यात. एका खिडकी खाली तरुणांना सर्व सहकार्य करण्याची आमची संकल्पना असून त्याद्वारे स्टॅन्ड अप कागल ही संकल्पना यशस्वीपणे राबवूया. असे श्री.घाटगे यांनी आवाहन केले.