सक्तीच्या लसीकरणाविरोधात आजरा येथे निदर्शने

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
आजरा तहसीलदार कार्यालय येथे लसीकरणाच्या सक्ती विरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन या संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला. या वेळी लसीकरणाला आमचा विरोध नाही, ज्यांना हवे आहे त्यांना दोन डोस देऊन हवं तर बूस्टरचेही चार पाच डोस द्या. पण ज्यांना लस घेण्याची इच्छा नाही त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या लसीकरणाच्या सक्तीला आमचा विरोध आहे असे आंदोलनकारी कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी . गौतम मोरे, . सलीम महागोंडे, . जुबेर माणगावकर, उबेद आगलावे, . हसन मकानदार, सूर्यकांत कांबळे, जयदीप कांबळे, गणेश कांबळे, . उवैस मुल्ला, . डोंगरे, ज्ञानेश्वर कांबळे व डाॅ. उल्हास त्रिरत्ने, इ. कार्यकर्ते उपस्थित होते.