उत्तूर येथील हुन्नर गुरुकुल प्रकल्पामध्ये आयोजित कार्यशाळा उत्साहात संपन्न.

उत्तूर :
रविवार दि. ०७/०३/२०२१ रोजी उत्तूर येथील हुन्नर गुरुकुल या महत्वकांक्षी प्रकल्पामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर येथील इ सिड या वास्तू विशारद तज्ञांच्या संस्थेतील अनुभवी वास्तुविशारद रत्नप्रभा पाटील, मीनाक्षी रेगडे, वंदना पुसाळकर व हर्षदा नाईक यांनी गुरुकुल मधील मुलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. पर्यावरण पूरक बांधकाम करण्यासाठी वापरण्यात येणारे स्थानिक संसाधने याची माहिती दिली.
तसेच चंदूर येथील श्री. राजशेखर कोळी यांनी गुरुकुल मधील मुलांना प्लास्टिक वस्तू न वापरता गाईच्या शेणापासून पणत्या, मूर्ती, तोरण असे विविध सुंदर वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले. हुन्नर गुरुकुल प्रकल्पाची माहिती संचालक श्री. अनिरुद्ध बनसोड यांनी दिली. यावेळी गुरुकुल मधील विद्यार्थी, निदेशक व वास्तुविशारद उपस्थित होते. कार्यशाळेचे नियोजन हुन्नर गुरुकुल चे प्रकल्प समनव्यक श्री. पांडुरंग जाधव यांनी केले.