राज्य शासनाने शेतकऱ्यांना शेती पाणी उपसा परवाने त्वरीत द्यावेत : शेतकऱ्यांनी केली जोरदार मागणी
सावरवाडी प्रतिनिधी :
शेतीला हंगामानुसार पाणी वेळेवर मिळत नसल्याने शेतीच्या उत्पादन घटू होऊ लागले आहे . नव्या बदलत्या काळात शेतीची उत्पादन क्षमता वाढण्यासाठी राज्य शासनाने नदीपात्रातून शेतकऱ्यांना शेती पाणी उपसा परवाने त्वरित द्यावेत अशी जोरदार मागणी बागायतदार शेतकऱ्यांनी केली .
वाढत्या महागाईच्या काळात ग्रामीण भागातील सहकारी पाणी पुरवठा संस्थेची वाढीव पाणी पट्टी दर शेतकऱ्यांना परवडत नाहीत . शेतीच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे . शेती पीकांना सात दिवसाच्या अंतराने पाणी लागते . हंगामा नुसार पाणी मिळत नसल्याने उत्पादनात घट होते . त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागतो . अपुऱ्या पाण्यामुळे पीकांचे उत्पादन मिळू शकत नाही .
नव्या सुधारित शेती धोरणानुसार शेतीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी पाणी पुरवठा संस्थेकडून पाणी उपसा परवानाबाबत आडवणूक केली जाते . हा शेतकऱ्यांच्यावर अन्याय आहे .महाविकास आघाडी सरकारने कायद्यात बदल करून शेतकऱ्यांना पाणी उपसा परवाने त्वरीत द्यावेत . अन्यथा भावी पिढी शेतीपासून परावृत्त होईल
ग्रामीण भागात शेतीला पाण्याची नितांत गरज असून सहकारी पाणी पुरवठा संस्थांच्या कडून पाण्याचे नियोजन होत नाही . अनेक गावांच्या पाणी पुरवठा संस्था बंद पडू लागल्या आहेत . त्यामुळे शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे.
ग्रामीण भागात सहकारी तत्त्व वर चालणाऱ्या पाणी पुरवठा संस्था यांच्या पाणी पट्टीची दरवाढ ही शेतकऱ्यांना परवडत नाही . त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
शेतकऱ्यांना पाणी उपसा परवाने द्या !
शेतीला हंगामा नुसार पाणी मिळणे गरजेचे पाणी पुरवठा संस्था या राजकिय अड्डा बनले असुन पाणी वाटपात दुजाभाव केला जातो त्याचा परिणाम शेतीचे उत्पादन घटले जाते . नदीवरुन पाईप लाईन टाकण्यासाठी महा विकास आघाडीने शेतकऱ्यांना पाणी परवाने विना अट द्यावी
मुकुंद पाटील
संस्थापक अध्यक्ष आझाद हिंद क्रांती संघटना कोल्हापूर जिल्हा