कोगे-बहिरेश्वर दरम्यान भोगावती नदी पात्रातील बंधाऱ्याचा पिलर कोसळला; ग्रामीण जनतेमध्ये भितीचे सावट

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील कोगे ते बहिरेश्वर दरम्यान भोगावती नदीपात्रातील बंधाऱ्याचा पिलर कोसळला गेला . बंधाऱ्याचे बांधकाम दिवनदिवस जीर्ण होऊ लागले आहे. या मार्गावरील होणारी ग्रामीण वाहतुक धोकादायक बनली असल्याने ग्रामीण जनतेत भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.
भोगावती नदीपात्रात गेल्या पाच दशकापूर्वी . कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बांधण्यात आला होता . अनेक गावांच्या सार्वजनिक पाणी योजना कार्यान्वीत आहेत. पिण्यास आणि शेतीला पाणी पुरवठा करता यावा यासाठी गेल्या ५० वर्षापूर्वी दगड माती सिमेंट सळई कॉंक्रीटिकरण मध्ये बांधण्यात आला होता.आता हा बंधारा धोकादायक अवस्थेत आहे.
दरम्यान बंधाऱ्याचा पिलर कोसळल्याचे वृत्त समजताच करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सुर्यवंशी यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पहाणी केली. लगेच पाटबंधारे विभागाचे अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी माहिती दिली . बंधाऱ्याची पाटबंधारे खात्याने पहाणी केली.
या बंधाऱ्याची उंची कमी असल्याने अवजड वाहतुक सुरू असते. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात ऊसाचे ट्रक, ट्रॕक्टर ट्रॉली, उसाच्या गाड्या तसेच इतर अवजड वाहने यावरून प्रवास करतात .बंधाऱ्याचा संरक्षण कठडा पुर्णतः निसटला आहे.
पश्चिमेकडून पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे बंधाऱ्याचा संरक्षण कठडाच तुटला आहे .तसेच बंधाऱ्याचे पिलर मुख्य पुलापासून वेगळे होऊन एकेक बाजूला सरकू लागले आहेत. पिलर निकामी झाले असल्यामुळे भविष्यात हा बंधारा वाहून जाण्याची व जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.