ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आसिफखान पठाण यांची अखिल भारतीय हॉकी स्पर्धेसाठी निवड

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

केंद्र शासनाचे विदयमाने भुवनेश्वर ( ओरिसा ) येथे होणाऱ्या अखिल भारतीय नागरिक सेवा हॉकी स्पर्धा 2023-24 करिता आसिफखान पठाण- परिरक्षण भूमापक मुरगूड यांची शासनाच्या राज्य संघात सलग चौथ्यांदा निवड झाली. मुंबई येथील महेंद्र स्टेडियम येथे सदर निवड चाचणी पार पडली. आसिफखान पठाण हे कास्टाईव भूमि अभिलेख संघटनेचे जिल्हाअध्यक्ष आहेत.

सदर निवडी कामी त्यांना सुदाम जाधव- जिल्हाअधीक्षक भूमि अभिलेख (कोल्हापूर), श्री. सौरभ तुपकर- उप अधीक्षक भूमि अभिलेख (कागल), यांचे मार्गदर्शन तर मध्यवर्ती भूमि अभिलेख संघटनेचे अध्यक्ष युवराज चाणके, कार्याध्यक्ष- नंदकुमार इंगळे, सल्लागार- प्रशांत पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks