ताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थीदशेपासूनच मुलांनी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करून घेणे ही काळाची गरज : सॉफ्टवेअर इंजिनियर प्राजक्ता साळोखे;  बेंटली कंपनीमार्फत शेणगांव येथील कुमार भवन, शेणगांव शाळेस एक लाखाचे ई लर्निंग साहित्य भेट

गारगोटी प्रतिनिधी : 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा फायदा होण्यासाठी तसेच बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती गावामध्येच उपलब्ध होण्यासाठी बेंटली इंडिया कंपनी सदैव कार्यतत्पर असते, असे प्रतिपादन कंपनीच्या सॉफ्टवेअर इंजिनियर प्राजक्ता साळोखे यांनी केले.

विद्यार्थीदशेपासूनच मुलांनी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करून घेणे ही काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील टॅलेन्ट पुढे येण्यासाठी बेंटली इंडिया कंपनी सदैव वचनबद्ध आहे, असे देखील त्या म्हणाल्या. शेणगांव येथील कुमार भवन, शेणगांव (ता.भुदरगड) या प्रशालेत एक लाखाच्या ई-लर्निंग साहित्य वाटप प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी बोलताना प्रशालेचे मुख्याध्यापक शिंदे सर यांनी बेंटली इंडिया कंपनी व साळोखे परिवाराचे शाळेस उपयुक्त साहित्य दिल्याबद्दल आभार मानले.

साहित्य प्रदान कार्यक्रमास शेणगांवचे सरपंच सुरेश नाईक, उपसरपंच संग्राम कांबळे, ग्रामपंचायत सदस्या शिल्पा तेली, ग्रापंचायत सदस्य भैरवनाथ कुंभार, ओंकार विभुते, इंजि. दीपक साळोखे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी –  विद्यार्थिनी उपस्थित होते.

सदर साहित्य शेणगांव येथील शाळेस मिळवून देण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी राजेंद्र साळोखे, संजय साळोखे, विजय साळोखे(पोलीस पाटील, शेणगांव) यांनी विशेष प्रयत्न केले. 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks