चंदगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिवपुतळ्याचे जल्लोषी स्वागत

चंदगड प्रतिनिधी : रुपेश मऱ्यापगोळ
अख्खे चंदगड शहर बनले शिवमय छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, टाळ मृदुंगासह हरिपाठाचा गजर व हलगी लेझीमच्या निनादात अश्वारूढ शिव पुतळ्याची लक्षवेधी मिरवणूक चंदगड शहरात जल्लोषी वातावरण पार पडली. शनिवारी 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त छत्रपती शिवाजी महाराज कला क्रीडा मंडळाच्या नेटक्या नियोजनामुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते.
चंदगड येथे शिवस्मारकाचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी कोल्हापूर येथून आणलेल्या अश्वारूढ शिव पुतळ्याचे शहरातून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये शिवभक्त महिला व आबाल वृद्धांचा सहभाग लक्षणीय होता टाळ मृदंगाचा गजर व हलगी या पारंपरिक वाद्यामुळे मिरवणुकीला मोठी रंगत आली होती अनेक ठिकाणी शिव पुतळ्याचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.
मिरवणुकीत आमदार राजेश पाटील, शिवाजी पाटील,भरमु पाटील गोपाळराव पाटील,संग्राम कुपेकर, दयानंद काणेकर, सचिन बल्लाळ, नगराध्यक्ष प्राची कानेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांच्यासह शिवभक्त सहभागी झाले होते. हार घालण्यासाठी जेसीबी चा वापर अश्वारूढ शिव पुतळा उंच असल्यामुळे भाजपाचे शिवाजी पाटील, भरमु पाटील,नामदेव पाटील, आमदार राजेश पाटील यांनी जेसीबीचा आधार घेऊन पुतळ्याला हार घातला.