कोल्हापूर : शहीद संदीप बाबासो भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नरंदे(ता.हातकणंगले)येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले संदीप बाबासो भोसले(वय ३८)यांना वीरमरण प्राप्त झाले.पुणे येथील सीएएफव्हीडी मध्ये ते सैन्यसेवा बजावत होते.आजारी असल्याने गेली महिनाभर त्यांच्यावर सैन्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.आज सकाळी त्यांचे निधन झाले.
हजारो ग्रामस्थांच्या उपस्थीतीत दुपारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले.पत्नी वसुंधरा,लहान मुलगी वैष्णवी(वय ११) व मुलगा समर्थ (वय ४)यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
संदीप हे गेली वीस वर्षे सैन्यदलात कार्यरत होते.आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.दुपारी तीनच्या सुमारास त्यांचे पार्थिव गावात घरी आणण्यात आले. कुटुंबीयांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर ग्रामपंचायत चौकात ग्रामस्थांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.त्यानंतर सजविलेल्या ट्रॅक्टर मधून त्यांची अंत्य यात्रा काढण्यात आली.अमर रहे अमर रहे वीरजवान संदीप भोसले अमर रहे..वीरजवान तुझे सलाम..भारत माता की जय..अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.