मुरगूडच्या राष्ट्रीय हरितसेनेच्या वतीने वृक्षास राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड (ता .कागल )येथील शिवराज विद्यालय ज्युनि कॉलेज मुरगूडच्या राष्ट्रीय हरितसेनेच्या वतिने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शाळेच्या परीसरातील स्व खासदार सदाशिवराव मंडलिक स्मृती स्थळावरील वटवृक्षास मोठी राखी बांधून रक्षाबंधन समारंभ पार पडला . तसेच शाळेतील विधार्थी विधार्थिनी शिक्षक शिक्षीका यांनीही शाळे बंधूभावाचे नाते दृढ करणे साठी एकमेकाना राख्या बांधल्या .
यावेळी जयशिवराय एज्यु.संस्थेचे कार्यवाह आण्णासो थोरवत यांचे हस्ते वृक्षास राखी बांधनेत आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य बी आर बुगडे होते. यावेळी हरितसेना समन्वयक प्रविण सुर्यवंशी यांनी स्वागत प्रास्ताविकातून वृक्ष आपले संरक्षक बंधू असल्याचे स्पष्ट केले . या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक डी.बी. पाटील, पर्यवेक्षक एस.पी. कांबळे, एस डी कांबळे एस एम कुडाळकर, डी एम सागर , बी आर मुसळे, डी एल कुंभार , आर ए जालिमसर , एस् एस् मुसळे, पी डी रणदिवे ,विष्णू मोरबाळे , एन्एच् चौधरी ,सौ एस जे कांबळे , एस डी देसाई , व्ही व्ही धडाम ,सौ जी एस डवरी, शिक्षक बंधूभगिनी व हरितसेनेचे विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते .आभार संदिप मुसळे यांनी मानले .