ताज्या बातम्यासामाजिक

नगराध्यक्षांनी तहसिलदारांकडे केला विनामोबदला काम करण्यासाठी अर्ज

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये विनामोबदला काम करण्याची संधी देण्याकरीता तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे अर्जाद्वारे विनंती केली आहे.

जमादार यांनी आपले शिक्षण बीए पूर्ण असून सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह आणि जिल्ह्यामध्ये कोरणाचे मोठे संकट उभे आहे. शासनाने सर्व मंत्री महोदय जिल्हाधिकारी आणि त्यांचे सर्व अधिकारी, आरोग्य विभागाचे सर्व डॉक्टर्स व आपण या संकटातून मुक्त होण्यासाठी सर्व उपाययोजना करत आहात. शर्थीने आपले जीव धोक्यात घालून लढत आहात. त्याबद्दल अभिनंदन.

शासनामार्फत मुरगूड ग्रामीण रुग्णालयात नवीन कोविड सेंटर सुरू करत आहात. या सेंटर मध्ये मला विनामोबदला काम करण्याची संधी द्यावी. आपण कोरोणा प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पहिल्या लाटेमध्ये नगरपालिके च्या कर्मचारी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्याबरोबर कोरोना विरोधातील लढ्यामध्ये व सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो. तसेच अनेक कोरोना बाधित मृत व्यक्तींवर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे समवेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यामध्ये सहभागी होतो. सध्या या अडचणीच्या काळामध्ये माणसाने माणसाला मदत केली नाही . तर माणसाने जगण्याला काही अर्थ नाही. आम्हाला काळ माफ करणार नाही. त्यामुळे होणार्‍या सेंटरमध्ये विनामोबदला कोणतेही काम म्हणजे स्वच्छतेचे सुद्धा काम दिले तरी मी आनंदाने करण्यास तयार आहे. मला रुग्णांची सेवा करण्याची संधी द्यावी अशी अपेक्षा.

लोकप्रतिनिधीचे पद हे नुसते शोभेचे पद नसून लोकसेवक म्हणून काम करताना त्यामध्ये तळमळ हवी. जमादार यांच्या या पत्रातील मजकूराने त्यांची तळमळ व्यक्त करणारी ठरली आहे. कोरोणा महामारीच्या काळात शहरासह परिसरातील रुग्णांसाठी झटणाऱ्या नगराध्यक्ष जमादार यांचा हा अर्ज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks