ताज्या बातम्यामहाराष्ट्र
बापच झाला वैरी ; यळगुडच्या 9 वर्षीय मुलीचा इचलकरंजीत घातपात

कोल्हापूर प्रतिनिधी :
यळगुड (ता.हातकणंगले) येथील बेपत्ता नऊ वर्षिय या मुलगीचा सावत्र बापानेच इचलकरंजी येथील पंचगंगा नदीमध्ये ढकलून देऊन घातपात केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यादृष्टीने पोलीसांनी इचलकरंजी येथील पंचगंगा नदी परिसरात मुलीचा शोध सुरु ठेवला आहे. युवराज आत्माराम साळुंखे ( वय ४० रा. यळगुड) असे संशयित नराधमाचे नांव आहे.
खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली
मुलगी रविवारी रात्री सातच्या सुमारास बेपत्ता झाल्याची फिर्याद संशयित युवराज साळुंखे यांने दिली होती. पोलीसांनी मुलगीच्या शोधासाठी रात्री पासूनच जंग जंग पछाडलं. चौकशीत युवराज साळुंखे याच्यावर संशय बळावला.त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्यांने गुन्ह्याची कबुली दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, उपनिरीक्षक विजय मस्कर आदी करत आहेत.