कोल्हापूर : बाजारभोगाव येथील त्या बेपत्ता महिलेचा मृतदेह अखेर कासारी नदीच्या पात्रात सापडला

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
कोल्हापुर,बाजारभोगाव पैकी मोताईदेवी येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह रविवारी संध्याकाळी कासारी नदीच्या पात्रात आढळून आला. संपदा नारायण बने (वय ४०, रा. बाजारभोगाव पैकी मोताइवाडी, ता पन्हाळा) ह्या नवरात्र काळात देवळातून उसाच्या शेतात गेल्यानंतर तेथून त्या बेपत्ता झाल्या होत्या.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संपदा बने ह्या मोताईदेवी देवीच्या मंदिरात नवरात्रीसाठी बसल्या होत्या. बुधवारी दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्या परिसरातील उसाच्या शेतात गेल्या होत्या. त्यानंतर त्या परत आल्याच नाहीत म्हणून कळे पोलिसात याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली होती. पोलीस आणि ग्रामस्थाकडून शोधमोहीम सुरु होती पण त्या सापडल्या नव्हत्या. काल रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास कासारी नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पन्हाळा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.