मुरगुड : छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा उभारणी बांधकामास सुरुवात

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड (ता. कागल) येथे नगरपालिकेच्या उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा १ कोटी रुपये खर्च करुन उभारला जाणार आहे. या कामाला वेग आला आहे.यापूर्वी उद्यानात छत्रपती शिवरायांचा अर्धपु बसविण्यात आला होता. तो उतरण्यापूर्वी विधीवत उत्तरपूजा करण्यात आली यावेळी दुग्धाभिषेक, जलाभिषेक मंत्रोच्चार शिवभक्त धोंडीराम परीट, सौ. सुनिता परीट यांच्या हस्ते विधीवत पुजा करण्यात आली.
मंडलिक युवा प्रतिष्ठान अश्वारुढ पुतळा देणार आहे. तर नगरपालिकेने चबुतरा बांधकामाची जबाबदारी घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी दिली. यावेळी उपनगराध्यक्षा सौ. रंजना मंडलिक, पक्षप्रतोद कलगुटगी, विरोधी पक्षनेता राहुल वंडकर, नगरसेवक नामदेव मेडके, धनाजीराव गोधडे, जयसिंगराव भोसले, विशाल सुर्यवंशी, मारुती कांबळे, रविंद्र परीट, बाजीराव गोधडे, सुहास खराडे, नगरसेविका सौ. सुप्रिया भाट, प्रतिभा सुर्यवंशी, सौ. अनुराधा राऊत, रुपाली सनगर, सौ. वर्षाराणी मेंडके, सौ. रेखाताई मांगले, सौ. हेमलता लोकरे, दत्तात्रय मंडलिक, भगवान लोकरे, अनिल राऊत, राजेंद्र भाट, सचिन मेंडके, अक्षय शिंदे, अमर सनगर, विनयक हावळ, चंद्रकांत जाधव, किरण गवानकर, बाजीराव खराडे आदी प्रमुख उपस्थित होते.