ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगड : तेवुरवाडीच्या ते कोवाड मोरीवर डांबरीकरण करा ; नागरिकांची मागणी

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
तेवुरवाडी ते कोवाड या मार्गावर दोन मोरीवरील पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी झाले आहे.एका मोरीवर खडीकरण झाले आहे व एका मोरीवर मुरूम व खडी टाकून रस्ता वाहतुकीसाठी सुरू आहे मात्र तेवुरवाडी च्या पुढील बाजूस जी मोरी आहे त्या मोरीचे काही काम अपूर्ण आहे तर सदर दोन्ही मोरीवरील पुलावरील डांबरीकरण करून प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत अशी मागणी प्रवाशांतुन होते आहे.