ग्रामीण भागातील कुस्तीच्या तालीम मंडळांची अवस्था दयनीय ! कुस्ती कलेऐवजी तालीमी बनल्या राजकिय अड्डे ,

सावरवाडी प्रतिनिधी :
ग्रामीण भागात कुस्ती कलेला राजाश्रय मिळाला होता . कुस्तीच्या तालीम मध्ये पहाटे व संध्याकाळी गर्दी उडायची , व्यायाम, कुस्ती, मेहनतीचे सराव नित्याचे असायचे . गावची पोरं तालीमीच्या आखाड्यात दिसायची .पहाटेच्या वेळी तालीमीमध्ये शड्डूचा आवाज घुमायचा . शाळेकरी मुलांच्या पासुन ते वस्ताद मंडळी तालीमीत होती . हे तीन दशका पूर्वीचे चित्र होते .
व्हॉटअप, इंटरनेट, फेसबुट सोशल मिडीयाच्या युगात ग्रामीण भागात कुस्ती कलेकडे दुर्लक्ष झाले . ग्रामीण भागातील तालीम मंडळे आता गटातटातील राजकिय अड्डे बनले आहेत . सध्या तालीम मंडळांची अवस्था दयनिय बनल्याचे दृष्य ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे .
सध्या सोशल मिडीयाच्या युगात नवी तरुणाई कुस्ती कलेपासुन परावृत झाली . ग्रामीण भागात जुण्या जमान्यातील कुस्ती वस्तादांची संख्याही कमी झाली . कुस्ती कलेचे धडेही नामशेष झाले आहेत . वाढत्या महागाईच्या काळात कुस्तीचे खाद्य ही महाग झाले . ग्रामीण भागात जत्रा यात्रा उत्सव ही बंद पडलेत . नव्या जमान्यात कुस्तीच्या फंडांनाही घर घर लागली आहे . कुस्तीमध्ये राजकिय हस्तक्षेप वाढला गेला . गल्लोगल्लीमधील तालीमीच्या इमारती कुस्ती कलेपासुन ओस पडू लागल्या आहेत .
कुस्ती कलेतून नव्या पिढीचे करिअर घडू शकत नसल्याने सुशिक्षीत नवी पिढी कुस्ती कलेकडे वळत नाही . शिवाय गावागावातील तालमीही सध्या रिकाम्या पडल्या आहेत . राजकिय हस्तक्षेप होऊ लागल्याने तालीम मंडळे उद्वस्त होऊ लागली आहे
वस्ताद मंडळी राजकारणात !
राजकारण सर्व क्षेत्रात व्यापले आहे . कुस्ती कलेचे धडे गिरवण्यासाठी आता पैलवान व वस्ताद मंडळी राजकारणात गुंतल्याने कुस्ती कला ग्रामीण भागात कमी कमी होऊ लागली .