ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कर्नाटकच्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार

कोल्हापूर प्रतिनिधी :
बेळगावात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद गेल्या काही दिवसांपासून पेटला आहे. बेळगावात कानडींकडून मराठी माणसांवर खुनी हल्ले सुरू असून त्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असं सांगतानाच पश्चिम बंगालमधील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये सुरू असलेल्या खुनी हल्ल्यांवर गप्प का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना बेळगावातील हल्ल्यांवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. कन्नड वेदिकेकडून बेळगावमध्ये हल्ले सुरू असून या ठिकाणी सर्व पक्षीय शिष्टमंडळ पाठवलं पाहिजे. नाही तर कर्नाटकात तणाव वाढेल, असं सांगतनाच मी सुद्धा बेळगावला जाणार आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.