कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी पात्रातील पुलाचा संरक्षण कठडा बनतोय मृत्यूचा सापळा !

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील चाळीस गावांच्या ग्रामीण वाहतुकीची सोय असलेल्या कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदी पात्रातील पुलाच्या संरक्षण कठड्याची उंची कमी आहे . दररोज हजारो वाहनांची ये जा सुरु असते . मात्र हा संरक्षण कठडाच मृत्युचा सापळा बनू लागला आहे . हा कठडा किती जणांचे प्राण घेणार ? हा प्रश्न जनतेसमोर उभा आहे .
सन १९७१ साली भोगावती नदी पात्रात पुलाची उभारणी करण्यात आली .कोल्हापूर शहराकडे ग्रामीण भागातून ग्रामीण वाहतुक व्हावी . या पुलामुळे ग्रामीण दळणवळण सांधनाचा उपयोग झाला . मात्र या पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी येते
पुलाच्या दुतर्फा असलेला भरावा खचलेल्या अवस्थेत आहे . गेल्या पाच दशकापासुन या पुलाच्या उंची वाढविण्याचा प्रस्ताव शासनाच्या लालफिती मध्ये अडकुन पडलेला आहे . अनेक आंदोलन , उपोषणे झाली मात्र प्रश्नाकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले .पुलाच्या दक्षिण बाजूस लहान कठडा असुन यावर लोखंडी खांब उभारलेले नाही . कठड्या नजीक धोकादायक मोठमोठ्या दगडी शिळा आहेत . पुलाच्या पूर्व बाजूस मोठा उतार असल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात .या पुलावरून होणारी वाहतुक धोकादायक स्वरूपाची बनली आहे . त्यामुळे लहान मोठे अपघात घडतात . उंच कठडा बांधून लाखंडी खांब उभारण्यात आलेले नाही .परिणाम अनेक अपघात घडतात .
नदीपात्रातील दगडी शिळा काढण्याची मागणी जनतेतून होऊ लागली आहे . कसबा बीड ते महे दरम्यान भोगावती नदीपात्रात नव्याने पुलाची उंची वाढविणे गरजेचे आहे .
पाच जणाचे आतापर्यत बळी !
भोगावती नदी पात्रातील कमी उंचीच्या संरक्षण कठड्यामुळे गेल्या पाच वर्षात पाच जणांचे बळी गेले आहेत
दिशादर्शक फलकांची गैरसोय !
कसबा बीड महे पुला नजीक मुख्य वाहतकीच्या रस्त्यावर दिशादर्शक फलकांची गेल्या अनेक वर्षापासुन गैरसोय निर्माण झाली आहे .