महाराष्ट्रात पुन्हा अग्रितांडव! ठाण्यातील रुग्णालयात भीषण आग; चार रुग्णांचा मृत्यू

ठाणे प्रतिनिधी :
राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच थैमान घातले असताना. एकीकडे कोरोनाचा प्रचंड उद्रेक तर दुसरीकडे रुग्णालयांमध्ये दुर्घटना यात कोरोना रुग्णांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. नागपूर, मुंबई, नाशिक येथील रुग्णालयातील आगीच्या घटना ताज्या असतानाच आता राज्यात आणखी एका मोठी दुर्घटना घडली आहे.
नेमके घडले काय?
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात बुधवारी पहाटे 3 वाजून 40 मिनिटाच्या सुमारास आग लागली. यात चार रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मुंब्रा येथे जुन्या मुंबई-पुणे रोडवरील शिमला पार्क परिसरात असलेल्या हसन टॉवरमध्ये पहिल्या मजल्यावर प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटल मधील हि घटना आहे.
हि घटना घडली . यावेळी रुग्णालयात 20 रुग्ण उपचार घेत होते. यात आयसीयू वार्डात 6 रुग्ण, तर इतर वार्डात 14 रुग्ण होते.
आग लागल्याची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस, रुग्णावाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. आयसीयूमधील रुग्णांना तातडीने बिलाल रुग्णालयात हलविण्यात आलं.
या घटनेत चार रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे. रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मृतांच्या वारसांना पाच लाख, तर जखमींना एक लाख रुपये मदत दिली जाणार असे सांगतले आहे.