ताज्या बातम्या

गणेश मूर्तींना निर्बंध आल्याने करवीर तालुक्यातील कुंभार व्यावसायिक अर्थिक अडचणीत 

सावरवाडी प्रतिनिधी :

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सव सोहळ्यावरही प्रशासनाचे कडक निर्बंध असल्याने  दुसऱ्या वर्षी गौरी गणपतीचा सण साधे पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे . घरगुती गणपती मुर्ती दोन फूट तर सार्वजनिक गणेश मुर्ती चार फुट या नियमामुळे ग्रामीण भागातील तरुण मंडळामध्ये शांतता आहे . कोरोनाचा वाढता प्रभाव आणि गणेशोत्सवावर शासकिय कडक निर्बंध जारी केल्याने  करवीर तालुक्यातील कुंभार व्यवसायीक आर्थिक अडचणीत सापडले आहेत .

महापूर , कोरोना या संकटाना  सलग तीन वर्ष कुंभार व्यवसायीकांना  सामोरे जावे लागले . कोरोना महामारीचा आर्थिक फटका मुर्तीकारांना बसला आहे . कोरोना बरोबर वाढत्या महागाईच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव सोहळा साधेपणे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे . गणेशोत्सव सोहळ्यात कडक निर्बंधामुळे ८० टक्के मंडळांनी यावर्षी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत . फक्त चार फुटी गणेश मुर्ती प्रतिस्थापना करण्यात येणार आहे . सार्वजनिक गणेशमुर्ती बनविण्यासाठी ऑडरही तरुण मंडळांनी दिलेल्या नाहीत . ग्रामीण भागातील कुंभार व्यवसायिक आर्थिक दृष्टीकोनातून अडचणीत आले आहेत .

या वर्षीचा गणेशोत्सव सोहळा कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागात अल्प प्रमाणात साजरा होणार असल्याने कुंभार समाजाने गणेशमुर्ती कमी प्रमाणात बनविण्याचे निर्णय घेतले आहेत . घरगुती गणपती बनविले जात आहेत . 

मुर्तीना निर्बध आल्याने आर्थिक संकट ! ! 

गेल्या तीन वर्षामध्ये महापूर , कोरोना महामारी या संकटामुळे गणेशोत्सव सोहळा साधेपणाने साजरे होऊ लागले . त्यामुळे ग्रामीण  मुर्तीकारांना आर्थिक फटका बसला आहे . गणेशमंडळांच्या मुर्तीना मर्यादा आल्या आहे . वाढती महागाई यामुळे खर्च वाढत आहे .               

दिपक कुंभार 

मुर्तीकार कसबा बीड ता . करवीर  

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks