शिरोली दुमाला येथे वन प्राण्यांच्या हल्ल्यात दहा बकरी ठार; दोन लाखाचे नुकसान.

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथील गावच्या पश्चिमेला असलेल्या गुरवाची खडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री बकऱ्यांच्या तळावर वन्य प्राण्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दहा बकरी ठार झाली आहेत. यामध्ये मेंढपाळाचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती नुसार गावच्या पश्चिम दिशेला गुरवाची खडी परिसरात एकनाथ पाटील यांची आंब्याची बागेतील शेतीमध्ये रघुनाथ विठ्ठल गावडे रा सावरवाडी यांचा बकरांचा तळ बसला होता . गुरुवारी रात्री पाऊस पडल्याने मेंढपाळ लोक एका शेडमध्ये झोपी केल्याने वन्यप्राण्यानी बकऱ्यांच्या कळपावर अचानकपणे हल्ला केला . या हल्ल्यात दहा बकऱ्यांचा मृत्यू झाला . सदर घटनेमुळे मेंढपाळ व्यवसायिक वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेस्थळी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, वनविभागाचे अधिकारी डॉ. ए. एस. इंगळे, डॉ. ए. एस. माने, वनरक्षक विजय पाटील, बाळासाहेब कोळेकर, बाबासाहेष धनगर ,यांनी प्रत्यक्ष पहाणी करून पंचनामा केला आहे.