मराठा आरक्षण रद्द होण्याच्या विरोधातील सागर मांजरे यांच्या उपोषणास तात्पुरती स्थगिती.

गडहिंग्लज प्रतिनिधी : सोहेल मकानदार
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण कायदा रद्द केला. याचे महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज मधील नूल येथील सागर मांजरे यांनी आमरण उपोषण केले होते. ५८ मराठा क्रांती मोर्चे, ४३ तरुणांच्या बलिदानानंतर देखील अखेर मा. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हे आरक्षण वैध असल्याचा दिलेला निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने रद्द ठरवला आहे. राज्यातील मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास नसल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
या निर्णयानंतर लगेचंच सागर मांजरे उपोषणास बसले होते. सध्या राज्यातील कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता, मांजरे यांनी उपोषण तात्पुरते स्थगित करावे अशी विनंती सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना करण्यात आली होती. आज सकल मराठा समाजच्या वतीने, मराठा मंडळाचे अध्यक्ष किरण कदम, उपाध्यक्ष शिवाजीराव भुकेले, अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष सुधीर शिवणे, मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले, माजी नगर अध्यक्ष वसंतराव यमगेकर, कोल्हापूर जिल्हा मराठा महासंघाचे अध्यक्ष मारुतीराव मोरे, सामाजिक कार्यकर्ते युवराज बर्गे यांनी मांजरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोरोना प्रादुर्भाव आणि नागरिकांच्या आरोग्य हिताची दक्षता म्हणून हे उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. मांजरे यांनी या विनंतीचा आदर करून हे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
मराठा समाजाचे आरक्षण रद्द होणे, हा मराठा समाजावरील अन्याय असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. या उपोषणास जितेंद्र शिंदे , सचिन शिंदे, आदेश विचारे, विनायक शिंदे, तौसिफ बुड्डण्णावर, संजय पाटील,संदीप शिंदे, सचिन कदम, गोपी चव्हाण, सुशांत शिंदे, आकाश गोईलकर, प्रथमेश जाधव, सुहास मोरे, किरण पोवार, मारुती मांगणुरे, अमित चव्हाण, डॉ. दिलीप मांजरेकर, सचिन रद्दके, संतोष भोसले, अण्णापा कुराडे, एन. टी. नवलाज, उमेश रामजी, योगेश शिंदे, संजय पाटील, रामचंद्र फडके, ऍड. चंद्रकांत निकम, दिपक पवार, युवराज लोखंडे, युवराज राऊत, राजकुमार दिवटी, बंडुपंत चव्हाण, प्रकाश देसाई, इंजल सर, सुनील शिंदे, शामराव यादव यांनी उपोषणास पाठिंबा दिला.