तरण्या नक्षत्रात भोगावती नदी ने गाठला तळ

कौलव प्रतिनिधी :
यावेळी मान्सून वेळेवर दाखल झाल्यामुळे रोहिणीचा पेरा व मोत्याचा तुरा हा मुहूर्त बळीराजाने साधला आहे त्यामुळे भात भुईमूग ,ज्वारी, सोयाबीन पिकाची उगवन जोमाने झाली होती आणि नदी,नाले तुडूंब भरुण वाहु लागली होती परंतु २१ जून रोजी आद्रा नक्षत्र चालू झाले होते पण या नक्षत्रात पावसानी पूर्णपणे दडी मारली आहे पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या आंतरमशागतीची कामे पूर्ण झाली आहेत ऊनाचा एवढा तडका इतका प्रचंड वाढला आहे की जणू काही चैत्राचा महीना आहे की काय असे वाटू लागले आहे परिणामी सर्व जोमाने आलेली पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडे भात व नाचना रोप लागण जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते सध्याच्या परिस्थितीत भात पिकाचे तरवे लावणी योग्य आले आहेत पण पाऊस नसल्यामुळे रोप लागण खोळंबली आहेत काही ठिकाणी रोप लागण केल्या परंतु पाण्याअभावी वाळु लागली आहेत.
पावसाळा म्हंटलं कि तरणा नक्षत्रात पाऊस जोरात असतो या नक्षत्रात पूर स्थिती निर्माण होते पण आजची परिस्थिती बघितले तर भोगावती नदी ची पाण्याची पातळी एकदम कमी झाली आहे आद्रा नक्षत्र कोरडे गेले आहे त्यामुळे पावसाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत