ताज्या बातम्यामहाराष्ट्र
बेनिक्रे येथे पालकांचे वतीने शिक्षकांचा सत्कार

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील बेनिक्रे येथे शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विद्या मंदिर बेनिक्रे शाळेने क्रीडास्पर्धा, प्रज्ञाशोध परीक्षा, मिशन अंकुर परीक्षा, विविध शैक्षणिक उपक्रम , शैक्षणिक सहल यामध्ये उत्कृष्ट नियोजन करून शैक्षणिक वर्ष यशस्वीपणे पार पडल्याबद्दल पालकांच्या वतीने मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी पालकांनी सर्व शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक वेगळा सोहळा विद्या मंदिर बेनिक्रे शाळेत पार पडला.यावेळी तेजस पाटील,मनोहर रामशे, शाळेचे मुख्याध्यापक जी.एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर झळके यांनी केले तर आभार शिवाजी असवले यांनी मानले.