ताज्या बातम्यामहाराष्ट्र

तारदाळ : कोरोचीच्या तरुणाचा निर्घृण खून

हातकणंगले प्रतिनिधी :

हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील प्राईड इंडिया औद्योगिक वसाहतीजवळ तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. संदीप शांताराम घट्टे (वय ३२ रा. धनगर माळ कोरोची ) असे त्याचे नाव आहे. तो हमाली काम करीत होता. इचलकरंजी शहर परिसरातील आठवड्यातील हा दुसरा खून असल्याने शहर परिसर पुन्हा एकदा हादरले आहे. मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत.

तारदाळ येथील प्राइड इंडिया औद्योगिक वसाहत व सांगले मळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर पहाटे चारच्या सुमारास कामावरून घराकडे परत जाणाऱ्या कामगारांना रस्त्यात तरुण पडल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ शहापूर पोलिसांना या घटनेची माहिती कळवली. शहापूर पोलिस घटनास्थळी येऊन पाहणी केली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks