ताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘ उपपदार्थ प्रकल्पांच्या उतम नियोजनामुळेच ‘ बिद्री ‘ ची आर्थिक बॅलेन्सशीट स्ट्राँग….! ‘ माजी कृषीमंत्री खा.शरद पवार यांनी अध्यक्ष के. पी. पाटील यांची मुक्तकंठाने केली प्रशंसा

बिद्री प्रतिनिधी :

केवळ साखरेवर अवलंबून न राहता के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिद्री साखर कारखान्याने अन्य प्रकल्प उभारुन ते यशस्वी केले आहेत. या उपपदार्थ प्रकल्पांच्या उतम नियोजनामुळेच ‘ बिद्री ‘ ची आर्थिक बॅलेन्सशीट स्ट्राँग असल्याचे गौरवोदगार माजी कृषीमंत्री खा.शरद पवार यांनी काढले.
बिद्री साखर कारखान्याने एफआरपी नुसार प्रतिटन ३०५६ रुपये सभासदांना अदा केले आहेत. त्यामध्ये ६० रुपये वाढ करत अंतिम ऊसदर प्रतिटन ३११६ रुपये देण्याची घोषणा अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केली. कोल्हापूर दौर्‍यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी याची दखल घेत भेटण्यासाठी आलेल्या के.पी. पाटील यांचे कौतुक केले. तुम्ही अन्य कारखान्यांच्यासमोर आदर्श ठेवला आहे असे म्हणत श्री. पवार यांनी त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थित होते.
चार तालुक्यातील २१८ गावांचे विस्तीर्ण कार्यक्षेत्र आणि तब्बल ७० हजार सभासद असलेल्या कारखान्याची बॅलेन्सशीट मजबूत असणे हा व्यवस्थापकीय कौशल्याचा भाग असल्याचे सुचक व्यक्तव्य श्री.पवार यांनी यावेळी केले.ऊस उत्पादक घटकाला सक्षम करत कारखान्याचा कारभार अव्वल राखण्याचा आपला अभ्यास खरोखरच चांगला आहे असे मत व्यक्त करत त्यांनी के.पी. पाटील यांचे कौतुक केले.

” देशातील साखर कारखानदारीचे मार्गदर्शक व आमचे दैवत खा. शरद पवार यांनी भेटीदरम्यान कारखान्याचे पूरक प्रकल्प, वाढीव गाळप क्षमता, उभा करत असलेल्या इथेनॉल प्रकल्पाची माहिती घेतली. त्यांनी आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत बिद्रीच्या चांगल्या कामाचे कौतुक केल्याने उर्वरित कामासाठी मोठे बळ मिळाले. ” – माजी आम. के. पी. पाटील , अध्यक्ष बिद्री साखर कारखाना

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks