भुदरगड तालुक्याच्या वेदगंगा नदिपात्रात गावठी बॉंब टाकून मासेमारी करणाऱ्यावर कडक कारवाई करा : भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविणसिंह सावंत

गारगोटी प्रतिनिधी –
भुदरगड तालुक्याच्या समृद्ध पर्यावरण परिसरामधील वेदगंगा नदिपात्रात गावठी बॉंब ने मासेमारी करण्याचा अघोरी प्रकार गेले कित्येक महिणे सुरु असून महसूल व पोलीस प्रशासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केली असल्याची कडवी प्रतिक्रिया निसर्गमित्रांनी दिली आहे.वेदगंगा नदिचे पाणी दुषित करून जनतेचे व जलप्राण्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना शोधून काढून त्यांच्यावर, कठोर कारवाई करा अशी मागणी भाजपचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रविणसिंह सावंत यांनी केली आहे.
शेणगांव ता भुदरगड येथील जाणकार मस्त्यतज्ञ, मत्स्य उद्योजक योगेश कोळी म्हणाले की,हा अघोरी प्रकार इतका भयानक आहे की क्षणात नदिचे पाणी मोठ्या प्रमाणावर दुषित होवून आपण ते पिण्यासाठी व पिकासाठी वापरत आहोत.या बॉंब् च्या धक्याने आजबाजुच्या नदिकाठच्या जमिनीचे भुस्खलन मोठ्या प्रमाणात होवून शेततऱ्यांची तर अपरिमित हानी होत आहे.या शिवाय संपुर्ण नदितूल पाणी दुषित होवून मोठ्या प्रमाणात मासे मरत आहेत.भुदरगड तालुक्याती वेदगंगा नदिकाठच्या म्हसवे, गारगोटी, शेणगांव, आकुर्डे, करडवाडी, कडगांव अशा सर्वच ठिकाणी अनेकांच्या नजरा चुकवून हे अज्ञात इसम हा अघोरी प्रकार करत आहेत.अनेक शेतकऱ्यांनी या कृत्यास कडक विरोध केला आहे.पर्यावरणतज्ञांनी मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली आहे तरिही सहज मासेमारीच्या हव्यासापोटी हा प्रकार सर्रास होत आहे.तत्काळ हे गुंन्हेगार शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी आग्रही प्रविणसिंह सावंत, मस्त्य उद्योजक योगेश कोळी , पर्यावरणप्रेमी, निसर्गमित्रांनी केली आहे.येत्या काही दिवसात हे गुंन्हेगार शोधून न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा या समाजसेवकांनी दिला आहे.