ताज्या बातम्यामहाराष्ट्र
प्रा .डॉ. सुचिता भोसले महात्मा गांधी राष्ट्रीय शांतता प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

सावरवाडी प्रतिनिधी :
यशवंत ब्रिगेड प्रणित यशवंत प्रतिष्ठान तर्फ देण्यात येणारा सन २०२१ सालाचा महात्मा गांधी राष्ट्रीय शांतता प्रेरणा पुरस्कार प्रा डॉ सुचिता संतोष भोसले यांना देऊन सन्मानित करण्यात आले . गेल्या अनेक वर्षापासुन उत्कृष्ठ शैक्षणिक कार्यात दिलेल्या योगदानामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
प्रा. डॉ. भोसले यांनी शिवाजी विद्यापीठातून हिन्दी विषयातून पीएच डी केली. करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील महिला महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत . त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत .कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयात त्यांनी प्राचार्या म्हणूनही कांही वर्ष काम केले आहे.