मुरगूड पोलिसाकडून मोटरसायकल चोरट्यास अटक : चोरीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल सापडली

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
निपाणी हुन मुरगूडकडे विना नंबरप्लेट मोटरसायकल घेवून जाणाऱ्याची लिंगनूर चेक पोस्ट मुरगूड पोलीसांनी अधिक चौकशी केली असता ती मोटरसायकल चोरीची असल्याचे निदर्शनास आले त्यावेळी मोटरसायकल स्वार अनिल सदाशिव ममरदंडे वय ३९ रा आरग ता मिरज जि सांगली यास याबाबत अटक केली आहे.
याबाबत मुरगूड पोलीसातून मिळालेली माहिती अशी की मुरगूड पोलीस निपाणी मुरगूड मार्गावरील लिंगनूर (कापशी ) येथील चेक पोस्टवर सेवा बजावत असताना निपाणीहून मुरगूडकडे एक इसम विना नंबरप्लेट मोटरसायकल घेवून जात होता त्यावेळी पोलीसांनी त्याच्याकडे या गाडी बाबत अधिक चौकशी करीत असता मोटरसायकल चालवण्याचा परवाना व कागदपत्रे आहेत काय याबाबत पोलिसांनी विचारपूस करता तो कावराबावरा होऊन अडखळत बोलू लागला व समर्पक असे उत्तर दिले नाही. त्यानंतर सदर विना नंबर प्लेट असलेली हिरो स्प्लेंडर प्रो सिल्वर कलर मोटरसायकलचा इंजिन नंबर व चेसिस नंबर तपासून पाहिला असता ती चोरीस गेलेली मोटरसायकल एम एच 09 डीआर 9024 असल्याचे निष्पन्न झाले ही गाडी चोरीस गेल्याचा गुन्हा मुरगूड पोलीसात नोंद होता . याबाबत अनिल सदाशिव ममरदंडे वय ३९ रा आरग ता मिरज जि सांगली यास तात्काळ अटक केली त्याने ही गाडी चोरून नेल्याचे कबूल केले आहे. याबाबतचा गुन्हा मुरगूड पोलीसात दाखल झाला असून अधिक तपास मुरगूड पोलीस स्टेशनचे सपोनि विकास बडवे करीत आहेत. या संशयीत आरोपीवर कागवाड (कर्नाटक ) पोलीस स्टेशन मध्ये मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.