आयपीएस बिरदेव डोणे उद्या सोमवारी शिवराजच्या प्रांगणात ; पॉडकास्ट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजचा माजी विद्यार्थी बिरदेव सिद्धाप्पा डोणे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी परीक्षेत ५५१ वी रँक मिळवत आयपीएस होण्याचा बहुमान मिळवला. त्याच्या यशातून विद्यार्थ्यांना प्रेरणा व मार्गदर्शन लाभावे यासाठी शिवराज विद्यालयाच्या प्रांगणात त्यांचा विशेष सत्कार सोमवारी (ता. २८ ) सकाळी ८ ते १० या वेळेत होत आहे.
या निमित्ताने आयपीएस बिरदेव डोणे विद्यार्थ्यांशी पॉडकास्टच्या ( प्रकट मुलाखत ) माध्यमातून संवाद साधणार आहेत. पॉडकास्ट च्या माध्यमातून त्याने मिळवलेले यश त्यासाठी केलेला संघर्ष याचा उलगडा नव्या पिढीसमोर होणार आहे. ही नव्या पिढीसाठी पर्वणीच आहे. मुरगूड आणि परिसरातील पालकांसह स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी या अभिनव उपक्रमात सहभागी व्हावे. असे शिवराज विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.