अक्षय शेळके यांनी घरातील वेस्ट प्लास्टिक मटेरियल पासून बेस्ट फ्रॉम फिडर या संकल्पने अंतर्गत इको फ्रेंडली बर्ड फिटर केलेले कार्य कौतुकास पात्र : शारंगधर वसंतराव देशमुख

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे
मा.ना.सतेज उर्फ बंटी पाटील साहेब,मा.आ.ऋतुराज पाटील साहेब,मा.आ.चंद्रकांत जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहर उत्तर विधानसभा NSUI चे अध्यक्ष अक्षय शेळके यांनी बेस्ट फ्रॉम वेस्ट ह्या संकल्पने अंतर्गत इको फ्रेंडली बर्ड फिडर(Bird Feeder) तयार केला.हा फिडर घरातील वेस्ट प्लास्टिक मटेरियल पासून तयार करण्यात आला आहे.त्यासाठी कोणताही खर्च करण्यात आला नाही आहे.
आज मा.स्थायी समिती सभापती,नगरसेवक मा.शारंगधर देशमुख साहेब यांना ह्या उपक्रमाचे माहिती देण्यात आली, ह्या उपक्रमाबत शारंगधर देखमुख साहेबांनी कौतुक करून प्रभागात अशा प्रकारचे बर्ड फिडर लावण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
ह्यावेळी कोल्हापुर जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष मा.किरण सिद्धाप्पा पाटील,मा.उदय पोवार,मा.कनक जाधव,मा.आशिष माने आदी उपस्थित होते.